Type Here to Get Search Results !

विठ्ठलाची लोकप्रिय अभंग : सुंदर ते ध्यान | रूप पाहता | अवघाची संसार | घेई घेई माझे वाचे | छंद मजला

विठ्ठलाची लोकप्रिय अभंग : सुंदर ते ध्यान |  रूप पाहता | अवघाची संसार | घेई घेई माझे वाचे |  छंद मजला

#1#

जय पांडूरंग जय हरि |
हरि हरि जयजय रामकृष्ण हरि |
सावळे सुन्दर रुप विठेवरि ||
सावळे विठाई मावुली | भक्त जनांची सावूलि
स्वयंभू विठेवरि उभि राहिलि ||

#2#


अलंकापूरि पुण्यभूमि पवित्र
तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र
तया आठविता महापुण्यराशि
नमस्कार माझा श्रीसद्गुरु ज्ञानेश्वराशि

#3#


रुप पाहता लोचनी | सुख झाले हो साजनी ||
तो हा विट्ठल बरवा | तो हा माधव बरवा ||
बहुत सकृताची जोडी | म्हणून विट्ठले आवडी ||
सर्व सुखाचे आघर | बाप रखुमा देविवर ||

#4#


सुन्दर ते ध्यान उभे विठेवरी | कर कटेवरी ठेवुनीया ||
तुळशीहार गळा कासे पितांबर | आवडे निरंतर हेचि ध्यान ||
मकर कुंडले तळपती श्रवनि | कंटि कौस्तुभमणि विराजित ||
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख | पाहिन श्रीमुख आवडीन ||

#5#


छंद लागो तुझ्या नामाचा | सोहळा पाहिला पंढरीचा ||
पतीत पावन अनाथाच्या नाथा |
गजर होतो तुझ्या नामाचा |
अशी भक्ती मिळू दे मजला | सोहळा...|| 1||
दिंड्या पताका वैष्णवांचा |
गजर होतो तुझ्या नामाचा |
अशी भक्ती मिळू दे मजला | सोहळा...|| 2 ||
मुक्ताबाई बोले नाम बहू गोड |
संतांची संगत जोडावी फार |
अशी यूगे मिळू दे मजला | सोहळा...|| 3 ||

#6#


सुन्दर ते ध्यान पहा जाऊनी |
भक्तजना संभाळितो विठे उभा राहुनी ||

उभा असे विठेवर कटेवरी ठेऊनी कर |
कानीकुन्डल मुकडा कार, गळा शोभे तुळशीहार |
नेसला तो पितांबर दिसे शोभुनी | भक्तजना...|| 1 ||

विठू उभा ना बैसला, इकडे तिकडे दाटीयेला |
चराचर मागुन सारे विठेवर उभा राहिला |
गळ्यामध्ये कंठीहार दिसे शोभुनी | भक्तजना...|| 2 ||

सत्यानंद म्हणे विट्ठला, पाहिले डोळे भरुनी तुजला |
अंतरबाह्य तूचि भरला, कुठे नाही जागा उरला |
विट्ठल दर्शनाने पंढरी दिसे शोभुनी | भक्त जना... || 3 ||

#7#


अवघाचि संसार सुखाचा करीन
अवघाची संसार सुखाचा करीन |
आनंदे भरीन तिन्ही लोक ||१||
जाईन गे माये तया पंढरपुरा |
भेटेन माहेरा आपुलिया ||२||
सर्व सुकृतांचे फळ मी लाहीन |
क्षेम मी देईन पांडुरंगी ||३||
बाप रखुमादेवीवरू विठ्ठलेचे भेटी |
आपुले संवसाटी करुनी राहे ||४||

#8#


सुखाचें हे सुख श्रीहरी मुख
सुखाचें हे सुख श्रीहरी मुख ।
पाहतांही भूक तहान गेली ॥१॥
भेटली भेटली विठाई माऊली ।
वासना निवाली जिवांतील ॥२॥
चंद्रासी चकोर मेघासी मयूर ।
वाटे तैसा भर आनंदाचा ॥३॥ 
नामा म्हणे पाप आणि ताप दुख: गेले ।
जाहलें हें सुख बोलवेना ॥४॥

#9#


घेई घेई माझे वाचे 
घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥
तुम्ही घ्या रे डोळे सुख । पाहा विठोबाचे मुख ॥
तुम्ही ऐका रे कान । माझ्या विठोबाचे गुण ॥
मना तेथे धाव घेई । राहे विठोबाचे पायी ॥
तुका म्हणे जीवा । नको सोडू या केशवा ॥

#10#


आवडीनें भावें हरिनाम घेसी 
आवडीनें भावें हरिनाम घेसी ।
तुझी चिंता त्यासी सर्व आहे ॥१॥
नको खेद करूं कोणत्या गोष्टीचा ।
पती लक्षुमीचा जाणतसे ॥२॥
सकळ जिवांचा करितो सांभाळ ।
तुज मोकलील ऐसें नाही ॥३॥
जैसी स्थिति आहे तैशापरी राहे ।
कौतुक तूं पाहे संचिताचें ॥४॥
एका जनार्दनीं भोग प्रारब्धाचा ।
हरिकृपें त्याचा नाश आहे ॥५॥

#11#


छंद मजला विठ्ठलाचा
छंद मजला विठ्ठलाचा | ज्ञानदेव ज्ञानीयांचा ||
कैवल्याचा तो पुतळा | प्रगटला भूतला |
अंतरंगी मम जीवाचा |  ज्ञानराजा पंढरीचा ||
येई माझे हो विठाई | करुणाकर तू ये कान्हाई
परमानंदे परम विठाई |दास नामा तव चरणांचा ||

#12#


माझे शिर्डीची आवडी 
माझे शिर्डीची आवडी | पंढरपूरी येईन दूरी ||
पांडुरंगी म्हणे रंगले | गोविंदाचे गुण हे गाईले ||
जागृती स्वप्नी निवृत्ती नाथले | पाप रूप आनंदी नाथले ||
बाप रखुमा देवी वरू रखुमा निर्घुन | रूप विठेवरी राहिली खूण ||

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area