Type Here to Get Search Results !

मराठी गौळणी | नेसली ग बाई | टॉप १० Lyrics in Marathi Top Gaulan | LyricsStar.in

मराठी गौळणी Lyrics in Marathi Top Gaulan | LyricsStar.in


-1-

कृष्णा मजकडे पाहू नको || माझी घागर गेली फुटून ||धृ ||
डोईवर घागर हातामधे झारी || वेणीच गेली सुटून || कृ ||
भिंतीआड चढून आला माझ्या जवळी || न्हाणीत जपून || कृ ||
श्याम हा सुन्दर अति मनोहर || बहार हा घ्यावा || लुटून || 
हरिचा हा घ्यावा लुटून || कृ || 3 || 
माणिक प्रभू म्हणे प्रितीची राधा || हरिचरणी चाले जपून || 4 ||

-2-


बाजाराला विकण्या निघाली
दही दूध ताक आणि लोणी
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || धृ ||

गोकुळच्या त्या गाई म्हशीचं
खाणं सगळं राण माळाचं
उगीच कशाला चाखून बघायचं
पैशा विणा घेणं
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || १ ||

यमुनेचा तो अवघड घाट
चढता चढता दुःखतिया पाट
नेहमीच तयाची वारी कट
थांबू नका गवळणी
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || २ ||

महानंदाची वेडी माया
देवासाठी तिची सुखली काया
एका जनार्दनी पडू त्याच्या पाया
देवा लीन होवूनी
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || ३ ||

बाजाराला विकण्या निघाली
दही दूध ताक आणि लोणी

-3-


कृष्णा तुला मी ताकीद करते || कोणाच्या घरी कधी जाऊ नको || धृ ||
गवळ्या घरी बोभाट उठला || माठ दह्याचे फोडु नको || 1 ||
रागीट तुझा पिता नंद || मार तयाचा खाऊ नको || 2 ||
आलो गौळण कपटी राधा || तिच्या घरा तू जाऊ नको || 3 ||
पाळण्यात घालुनी झोके देते | आता मुळी तु रडु नको || 4 ||
वरज वाकड्या पेंद्या सुदामा | त्यांच्या डावामध्ये जाऊ नको || 5 ||
नामा म्हणे पतितपावन | त्याच्या नामा तू विसरु नको || 6 ||

-4-


जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला ।मथुरे ला नंदलाला रे गोपाळा
नंदलाला रे गोपाळा रे ।जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला
मथुरे ला नंदलाला रे गोपाळा नंदलाला रे गोपाळा

निघूनी गेल्या गवळणी साऱ्या।निघूनी गेल्या गवळणी साऱ्या
मथुरेच्या बाजाराला।मथुरेच्या बाजाराला
उशिरा झाला बाजाराला
नंदलाला रे गोपाळा रे ||धृ ||
जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला।मथुरे ला नंदलाला रे गोपाळा।।

निघूनी गेल्या गवळणी थाट । कृष्णा अडवू नको आमची वाट।।
उशीर झाला बाजाराला । नंदलाला रे गोपाळा रे । 
जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला ।मथुरे ला नंदलाला रे गोपाळा
नंदलाला रे गोपाळा रे ।जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला
मथुरे ला नंदलाला रे गोपाळा नंदलाला रे गोपाळा।।

एका जनार्दनीं गवळण राधा।एका जनार्दनीं गवळण राधा।
कृष्ण सख्या ची जडली बाधा। कृष्ण सख्या ची जडली बाधा।
उशीर झाला बाजाराला । नंदलाला रे गोपाळा रे ।
जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला ।मथुरे ला नंदलाला रे गोपाळा
नंदलाला रे गोपाळा रे ।जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला
मथुरे ला नंदलाला रे गोपाळा नंदलाला रे गोपाळा।।

-5-


धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर
गड़ा बांधुनिया दोर गड़ा बांधुनिया दोर
धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर

ह्रदय बंदी खाना केला
आत विट्ठल कोंडिला
शब्दी केलि जड़ा जोड़ी
विट्ठल पायी घातली वेडी
धरिला पंढरीचा चोर..

सोहम शब्दांचा मारा केला
विट्ठल कौकोड़ी ला आला
जनि मने का विट्ठला
जिवे न सोडी मी रे तूला
धरिला पंढरीचा चोर

धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर
गड़ा बांधुनिया दोर गड़ा बांधुनिया दोर
धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर

-6-


येते मी माघारी कान्हा जरा थांब ना ग
कान्हा जरा थांब ना ग कृष्णा जरा थांब ना ग

सोनियाचा पालना ग रेशमाची दोरी
हलविता हलविता झोका जाईन लाम्ब ना ग

कान्हा जरा थांब ना ग कृष्णा जरा थांब ना ग

सोनियाची विट्टी ग चान्दियाचा डांडू
टोलविता टोलविता टोला जाइन लांब ना
कान्हा जरा थांब ना ग कृष्णा जरा थांब ना ग

एका जनार्धनी दही दूध ताक लोणी
घुसडीता घुसडीता अंगा येईन घाम ना ग
कान्हा जरा थांब ना ग कृष्णा जरा थांब ना ग

येते मी माघारी कान्हा जरा थांब ना ग
कान्हा जरा थांब ना ग कृष्णा जरा थांब ना ग

-7-


कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून हो हो ..
घागर गेली घागर गेली
घागर गेली फुटून घागर गेली फुटून
कान्हा माझ्या कड़े पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून

पाचेची न्हानी गुलाबाचं पानी
न्हानित नाहते बसून हो हो ..
कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून...
कान्हा माझ्या कड़े पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून...

भिंती आड़ चढूनी आला माज्या जवडी
वाकुनी पाहतो दडून हो हो ..
कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून...
कान्हा माझ्या कड़े पाहू नकोरे
माझी घागर गेली फुटून...

एका जनार्धानी प्रीतिची राधा
हर्षाने चालली जपून हो हो ..
कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून...
कान्हा माझ्या कड़े पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून...

घागर गेली घागर गेली
घागर गेली फुटून घागर गेली फुटून
कान्हा माझ्या कड़े पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून

-8-


गवळण मथूरेला निघाली
कशी भूल पडली मला
गवळण मथूरेला निघाली

नेसले पितांबर शालू गं बाई
कृष्णा माझ्यासंगे आता नको बोलू
खेळ होईल तूझा रे, वेळ जाईल माझा
मग राग हवा कशाला
गवळण मथूरेला निघाली

पेंद्या सूदामाची जोडी बरोबरी हो
फोडीती आमूच्या उतरंडी
सासू बोलेल मला रे, शिव्या देईल तूला
मग राग हवा कशाला
गवळण मथूरेला निघाली

अनयातीही मी गवळण राधा, गवळण राधा
विसरून गेले घरकाम धंदा
निळा म्हणे रे श्री हरी, नको वाजवू बासरी
तूझ्या मूरलीने जीव वेडावला
गवळण मथूरेला निघाली

-9-


नको मारू रे कान्हा पिचकारी 
साड़ी रंगान भिजल माझी साड़ी 
कान्हा पड़ते रे पाया दही दूध देते रे खाया 
कातू रागावला माझा वरी 

गोकुलात जेव्हा तुझी माझी जोड़ी 
नित्य वाटेत कान्हा करतोय खोडी 
कान्हा पड़ते रे पाया....

गवळनि मधे मी गवळन छोटी 
तुझी वागनुक भल्तिच खोटी 
कान्हा पड़ते रे पाया दही दूध देते रे खाया 
चुगली सांगते माझा घरी 

गोकुलात तुझी माझी झाली निंदा 
सम्ध्यानी मला पहिलेच तिनदा 
कान्हा पड़ते रे पाया दही दूध देते रे खाया
नवरा मारू  देई पलंगावरी

-10-


नेसली ग बाई मी, चंद्रकला ठिपक्यांची.
बाई ठिपक्याची,
तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची,

शिट्टी मारून करतो गोळा गोपाळांचा मेळा.
राधिकेला अडवून धरतो मिठी मारतो गळा.
शर्त झाली बाई याची निर्लजपणाची,
या कान्हाची, या कृष्णाची.
तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची.

पाणीयाशी जात बाई, वाटेवरी उभा कान्हा.
सोड देवा पदर माझा, नार आहे परक्याची.
या कान्हा ची, या कृष्णाची.
तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची.

अजून याला नाही कळे करी तसे भलते चाळे.
सोड देवा पदर माझा चोळी आहे बुरख्याची.
या कान्हाची, या कृष्णाची.
तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची.

एका जनार्दनी गवळण हासुनी,
हरी चरणाशी मिठी मारूनी.
फिटली ग बाई माज्या, हौस या मनाची.
या कान्हाची, या कृष्णाची.
तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची.

नेसली ग बाई मी, चंद्रकला ठिपक्यांची.
बाई ठिपक्याची.
तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area