Type Here to Get Search Results !

विठ्ठलाचे अभंग मराठी लीरिक्स | अवघाची संसार | सुखाचे सुख | घेई घेई माझे वाचे | आवडीने भावे

 विठ्ठलाचे अभंग मराठी लीरिक्स | अवघाची संसार | सुखाचे सुख | घेई घेई माझे वाचे | आवडीने भावे 



अवघाचि संसार सुखाचा करीन
अवघाची संसार सुखाचा करीन |
आनंदे भरीन तिन्ही लोक ||१||
जाईन गे माये तया पंढरपुरा |
भेटेन माहेरा आपुलिया ||२||
सर्व सुकृतांचे फळ मी लाहीन |
क्षेम मी देईन पांडुरंगी ||३||
बाप रखुमादेवीवरू विठ्ठलेचे भेटी |
आपुले संवसाटी करुनी राहे ||४||

सुखाचें हे सुख श्रीहरी मुख
सुखाचें हे सुख श्रीहरी मुख ।
पाहतांही भूक तहान गेली ॥१॥
भेटली भेटली विठाई माऊली ।
वासना निवाली जिवांतील ॥२॥
चंद्रासी चकोर मेघासी मयूर ।
वाटे तैसा भर आनंदाचा ॥३॥
नामा म्हणे पाप आणि ताप दुख: गेले ।
जाहलें हें सुख बोलवेना ॥४॥

घेई घेई माझे वाचे 
घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥
तुम्ही घ्या रे डोळे सुख । पाहा विठोबाचे मुख ॥
तुम्ही ऐका रे कान । माझ्या विठोबाचे गुण ॥
मना तेथे धाव घेई । राहे विठोबाचे पायी ॥
तुका म्हणे जीवा । नको सोडू या केशवा ॥

आवडीनें भावें हरिनाम घेसी 
आवडीनें भावें हरिनाम घेसी ।
तुझी चिंता त्यासी सर्व आहे ॥१॥
नको खेद करूं कोणत्या गोष्टीचा ।
पती लक्षुमीचा जाणतसे ॥२॥
सकळ जिवांचा करितो सांभाळ ।
तुज मोकलील ऐसें नाही ॥३॥
जैसी स्थिति आहे तैशापरी राहे ।
कौतुक तूं पाहे संचिताचें ॥४॥
एका जनार्दनीं भोग प्रारब्धाचा ।
हरिकृपें त्याचा नाश आहे ॥५॥

 छंद मजला विठ्ठलाचा
छंद मजला विठ्ठलाचा | ज्ञानदेव ज्ञानीयांचा ||
कैवल्याचा तो पुतळा | प्रगटला भूतला |
अंतरंगी मम जीवाचा |  ज्ञानराजा पंढरीचा ||
येई माझे हो विठाई | करुणाकर तू ये कान्हाई
परमानंदे परम विठाई |दास नामा तव चरणांचा ||

माझे शिर्डीची आवडी
माझे शिर्डीची आवडी | पंढरपूरी येईन दूरी ||
पांडुरंगी म्हणे रंगले | गोविंदाचे गुण हे गाईले ||
जागृती स्वप्नी निवृत्ती नाथले | पाप रूप आनंदी नाथले ||
बाप रखुमा देवी वरू रखुमा निर्घुन | रूप विठेवरी राहिली खूण ||

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area